Ad will apear here
Next
रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्का कपात
कर्जे स्वस्त होणार, खरेदीला चालना

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. रेपो दर ६.२५ वरून सहा टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे गृह, वाहन तसेच अन्य कर्जे स्वस्त होणार असून, कर्जदारांच्या मासिक हप्त्यात घट होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीने गुरुवारी, चार एप्रिल रोजी झालेल्या २०१९-२० या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरात ०.२५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. समितीच्या सहापैकी पाच सदस्यांनी कपातीचे समर्थन केले. या वर्षात आर्थिक विकास दर सात टक्क्यांपर्यंत राहील असा अंदाजही या वेळी व्यक्त करण्यात आला.


बांधकाम क्षेत्राकडून स्वागत

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाने गृहकर्जदारांना दिलासा मिळाला असून, बांधकाम क्षेत्राने याचे स्वागत केले आहे. रेपो दरात कपात झाल्याने गृहकर्जाचे दर कमी होतील, त्यामुळे ज्यांनी गृहकर्ज घेतले आहे, त्यांचे मासिक कर्ज हप्त्यातही काहीशी घट होण्याची शक्यता आहे. गृहकर्जे स्वस्त झाल्याने ग्राहकांचा गृहखरेदीकडे कल वाढेल. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ताच्या आधी हा निर्णय झाल्याने गृहखरेदीला चालना मिळेल, असा विश्वास बांधकाम क्षेत्रातून व्यक्त होत आहे. 

अॅनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टन्सीचे अध्यक्ष अनुज पुरी
 ‘ही नव्या आर्थिक वर्षाची उत्तम सुरुवात आहे’, अशा शब्दात अॅनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टन्सीचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, रिझर्व्ह बँकेने लागोपाठ रेपो दरात कपात करून नवीन आर्थिक वर्षाची चांगली सुरुवात केली आहे.’

‘फेब्रुवारी २०१९ पासून आतापर्यंत रेपोदरात ५० आधारभूत अंकांची कपात झाली आहे. आता रेपो दर सहा टक्के झाला आहे, एप्रिल २०१८ मध्ये हाच दर होता. या दर कपातीमुळे देशातील बांधकाम क्षेत्राला चांगली चालना मिळेल. वर्ष २०१९ च्या पहिल्या तीन महिन्यातच सरकारने दिलेल्या विविध सवलती, योजना आणि रिझर्व्ह बँकेची दरकपात यामुळे गृहखरेदीदारांना प्रोत्साहन मिळाले आहे. देशातील प्रमुख सात शहरांमध्ये गृहविक्रीत २०१९ च्या पहिल्या तिमाहीत १२ टक्के वाढ दिसून आली आहे. रिझर्व्ह बँकेने केलेल्या रेपो दरातील कपातीनुसार, बँकांनी लगेचच कर्जाचे दर कमी केल्यास, कर्ज स्वस्त होण्याची वाट बघत असलेले गृहखरेदीदार खरेदीचा निर्णय पक्का करतील. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला गती मिळेल,’असेही पुरी यांनी नमूद केले.   
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZWXBZ
Similar Posts
रेपो दरातील कपातीचे रिअल इस्टेट क्षेत्राकडून स्वागत मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेल्या पाव टक्के कपातीमुळे गृहकर्जे स्वस्त होतील, तसेच रोखीची कमतरता दूर होईल, परिणामी रिअल इस्टेट क्षेत्रात खरेदीला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली.
रिझर्व्ह बँकेची दिवाळी भेट; रेपो दरात पाव टक्का कपात मुंबई : सणासुदीच्या काळात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का कपात करून सर्वसामान्य ग्राहकांना दिवाळी भेट दिली आहे.
एनईएफटी, आरटीजीएस होणार निःशुल्क; रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने अपेक्षेप्रमाणे रेपो दरात आणि रिव्हर्स रेपो दरात प्रत्येकी पाव टक्का कपात केली असून, एनईएफटी आणि आरटीजीएस व्यवहारांवरील शुल्कही रद्द केले आहे. आता नवा रेपो दर ५.७५ टक्के असून, नवा रिव्हर्स रेपो दर ५.५० टक्के झाला आहे. यामुळे बँका गृहकर्जांचे व्याजदर घटवण्याची अपेक्षा आहे
शेतकऱ्यांना खूशखबर; विनातारण कृषिकर्जाच्या मर्यादेत वाढ मुंबई : अर्थसंकल्पापाठोपाठ रिझर्व्ह बँकेनेही शेतकऱ्यांना खूशखबर दिली आहे. बँकेने द्वैमासिक पतधोरणात शेतकऱ्यांसाठी विनातारण कृषिकर्जाच्या रकमेत सुमारे ६० हजार रुपयांची वाढ केेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक लाखाऐवजी एक लाख ६० हजार रुपये कर्ज विनातारण मिळणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language